संवादवारी उपक्रमास उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची भेट

संवादवारी उपक्रमास उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची भेट

 

बारामती:-  राज्य शासनाने घेतलेल्या विविध लोक कल्याणकारी योजना, उपक्रम,अभियानाची माहिती देणारा 'संवादवारी' उपक्रमास  उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले. 

      जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा गुरुवार २६ रोजी बारामतीत मुक्कामास होता.बारामती नगर परिषद कार्यालय परिसरात आयोजित प्रदर्शनास भेटीप्रसंगी अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार,तहसीलदार गणेश शिंदे,उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड आदी प्रशासकीय सेवक  उपस्थित होते. 

      माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित संवादवारी उपक्रम स्तुत्य असून राज्य शासनाने घेतलेल्या विविध लोक कल्याणकारी योजना,उपक्रम, अभियान समाजातील तळागाळा पर्यंत प्रसार करण्यास मदत होते. या उपक्रमास वारीत सहभागी अधिकाधिक नागरिकांनी भेट देऊन विविध योजनांची माहिती जाणून घ्यावी,असे आवाहन श्री.नावडकर यांनी केले.