
बारामतीच्या 'म.ए.सो.'चे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
बारामती :- महाराष्ट्र एज्युके शन सोसायटीच्या येथील कै.ग. भि.देशपांडे विद्यालयाच्या विद्या र्थ्यांनी शहरी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवत विद्याल याचे नाव तालुक्यात उज्वल केले आहे.
देशपांडे विद्यालयातील निसर्गा बारवकरने पूर्व माध्यमिक शिष्य वृत्ती परीक्षा (८वी) मध्ये शहरी राज्य गुणवत्ता यादीत १४ वा क्रमांक व तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली आहे.तसेच पाचवीचे १२ व आठवीचे १२ असे २४ विद्यार्थी जिल्हागुणवत्ता यादीत येवून शासनाच्या शिष्य वृत्ती साठी पात्र ठरले आहेत.
पाचवीतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे : वेद हेमाडे, संस्कृती घोरपडे, वेदांत इंगळे, शिवरुप घाडगे, वेदांत शहाणे, अथर्व सोनवणे, प्रथमेश साबळे, पूर्वा चांदगुडे, आरुष शेंडगे, अधिराज लोणकर, शौर्य महाजन, अक्षया मोरे. आठवीतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी : निसर्गा बारवकर, प्रतिज्ञा कांबळे, जान्हवी रेवगे, कार्तिकी कचरे, गिरीजा देशमुख, सानवी पवार, गायत्री निंबाळकर, अवधूत बाबर, भक्ती बेंद्रे, अक्षता ठोंबरे, सई कुमठेकर, अलिया बागवान.
यशस्वी विद्यार्थ्यांना संतोष बरळ, संतोष शेळके, राजेंद्र जगताप, शंकर घोडे, रवींद्र गडकर, संजय आटोळे, मधुकर राठोड, दिपक गायकवाड, अभिमन्यू गंभीरे, मेधा चिंधे, सविता सणगर यांनी मार्गदर्शन केले.
संस्थेचे नियामकमंडळ अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, शाळा समिती अध्यक्ष अजय पुरोहित, महामात्र डॉ.गोविंद कुलकर्णी, समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी, मुख्याध्या पक धनंजय मेळकुंदे यांनी यशस्वी विद्यार्थी, शिक्षकांचे अभिनंदन केले.