
नगरपरिषद कामगार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेंद्र सोनवणे
सोमवार, १४ जुलै, २०२५
Edit
बारामती :- येथील बारामती नगरपरिषद कामगार पतसंस्थे च्या अध्यक्षपदी राजेंद्र सोनवणे तर उपाध्यक्षपदी सुवर्णा भापकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिका री म्हणून अमर गायकवाड यांनी काम पाहिले.
बारामती नगरपरिषद कामगार सहकारी पतसंस्था ही नावाजले ली पतसंस्था आहे.पतसंस्थेच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष निवडीसाठी व्यवस्थापक समिती सदस्यांची बैठक शुक्रवारी (दि.११) पार पडली.या वेळी सोनवणे व भापकर यांची बिनविरोध निवड पार पडली. संस्थेने दिलेल्या संधीबद्दल आभार व्यक्त करत सोनवणे म्हणाले, कार्यकाळात कामगार हिताचे निर्णय घेतले जातील.कामगारांचा विमा उतर वणे,पत संस्थेला हक्काची व कायमस्वरु पी इमारत उभी करणे आदी कामे हाती घेतली जातील.