
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात करिअर कट्टा
बारामती :- अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि महाविद्यालयातील करिअर कट्टा विभागाच्या संयुक्त विद्यमाने "विद्यार्थ्यांशी संवाद व करिअर मार्गदर्शन' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विविध शाखांतील २२० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी मार्गदर्शन केले.त्यांनी विद्यार्थ्यांना आयएएस, उद्योजक ता, डिजिटल करिअर,स्टार्टअप्स आणि -डिजिटल इंडिया अंतर्गत उपलब्ध संधी यावर सखोल मार्गदर्शन केले.
प्रा.डॉ.संजय खिलारे यांनी 'करिअर कट्टा' -उपक्रमाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ई-लर्निंग, सायबर सुरक्षा,डेटा ॲनालिटि क्स आणि सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग या 'कौशल्यविकास उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचव ली.करिअर कट्टाच्या समन्वयक प्रा.सलमा शेख यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन जान्हवी म्हात्रे हिने केले.करिअर कट्टा समन्वय क डॉ.दीपाली अनपट यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी माधुरी सस्ते,अश्विनी भोसले, दत्तात्रय आरडे,तृप्ती भोसले, सुप्रिया कदम, मनीषा भोसले, स्मिता कचरे यांनी परिश्रम घेतले.