
अजितदादांचा महत्त्वपूर्ण उपक्रम ; बारामतीतच वैद्यकीय मदत कक्ष कार्यरत
बारामती :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुढाकाराने बारामतीतील नागरिकांना अधिकाधिक दर्जेदार आणि वेळेत वैद्यकीय सेवा मिळावी आणि गरजुंना वैद्यकीय मदतीसाठी मंत्रालयात जावे लागू नये म्हणून 'वैद्यकीय मदत कक्ष' बारामती शहरात सुरु करण्यात आला आहे.या मदत कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना उपचार,शासकीय योजना,रुग्णालयांतील दाखल प्रक्रिया,रुग्णवाहिका सेवा, सुविधा व आर्थिक मदत,औषधो पचार यां बाबींमध्ये मदत आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्वीय सहाय्यक नितीन हाटे हे रुग्णांच्या सेवेसाठी सातही दिवस[ २४ x ७ ]अहोरात्र उपलब्ध राहणार असून कोणत्या ही आरोग्य विषयी अडचणींसाठी नागरिकांनी ९८१९६३८९०८/ ७९७७४७७३८२ या मोबाईल क्रमांकावर सपंर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा अनेक गरजू रुग्णांना फायदा होणार असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाबद्दल सर्व सामान्य व गोरगरीब नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.