मुंबई-महाराष्ट्रात राहायचे तर मराठी यायलाच हवी - सुनील शेट्टी

मुंबई-महाराष्ट्रात राहायचे तर मराठी यायलाच हवी - सुनील शेट्टी

 

बारामती :- हिंदी भाषेच्या सक्तीवरून महाराष्ट्र राज्यात सध्या वातावरण तापले  असतांना प्रसिद्ध सिने अभिनेते सुनील शेट्टी यांनी शिर्डीत मराठी भाषेतून भूमिका मांडत उपस्थित सर्वांचीच मने जिंकली.माझी जन्मभूमी जरी कर्नाटक असली तरी मुंबई ही माझी कर्मभूमी आहे.माणसाला कर्मभूमीची भाषा ही यायलाच हवी,अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी मराठी भाषेचा गौरव केला.

        सोमवारी ३० जून रोजी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर सिनेअभिनेते सुनील शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधला.मराठी भाषेबद्दल त्यांनी आपुलकीची भावना व्यक्त केली.    

      ते म्हणाले,मी मुंबईत राहतो. मला मराठी आलीच पाहिजे. मला मराठी बोलता आली नाही त्याचा त्रास दुसऱ्यांना नाही तर मलाच झाला पाहिजे.     

     दहशतवादाच्या मुद्यावरून सर्वच क्षेत्रांमध्ये पाकिस्तानशी संबंध तोडावेत,अशी परखड व स्पष्ट भूमिकादेखील त्यांनी यावेळी मांडली.