मोरोपंत सभागृह तासिका तत्त्वावर द्या; बारामती शहरातील नागरिकांची प्रशासनाकडे मागणी

मोरोपंत सभागृह तासिका तत्त्वावर द्या; बारामती शहरातील नागरिकांची प्रशासनाकडे मागणी

 

बारामती:- ज्या रसिक बारामतीकरांच्या सोयीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागा ने कविवर्य मोरोपंत नाट्यगृह उभारले आहे,त्याचा प्रत्यक्षात बारामतीकरांना शून्य उपयोग आहे.बारा कोटींचा खर्च नेम का कशासाठी केला गेला ? असा प्रश्न या बारामतीकर उपस्थित करीत आहेत. तासिका तत्त्वावर हे सभागृह कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिल्यास त्याचा वापर होऊन नागरिकांना उपयोग होऊ शकेल,अशी मागणी नागरिकांची आहे.

    सांस्कृतिक अभिरुची अधिक संपन्न व्हावी या उद्देशाने,विविध कार्यक्रमांचे सादरीकरण व्हावे, यासाठी ही वास्तू २०१५ मध्ये उभारण्यात आली. तेव्हापासून वर्षभरात १०-१२ कार्यक्रमांचा अपवाद वगळता इतर दिवस हे सभागृह बंदच असते.न परवडणाऱ्या दराचे सभागृह उभारून उपयोगच काय ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

     या सभागृहाची आसनक्षमता १२५० इतकी असून,मागील बाजूस चार खोल्या आहेत. वातानुकूलित सभागृह असून, वाहनतळालाही भव्य जागा आहे.रचना उत्तम असून,आवाज व इतर सुविधाही शहराच्या तोडीच्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे नाट्यगृह बारामतीत उभारले खरे ! मात्र,

रसिकांना १० वर्षात या नाट्य गृहाचा फारसा काहीच उपयोग झालेला नाही.भरमसाट शुल्क असल्याने येथे नाटक, कार्यक्रमांचे सादरीकरण करणे संस्थांना अगदीच अशक्य होऊन बसते.या नाट्यगृहा पासून उत्पन्न नगण्य व खर्च अधिक अशीच आतबट्टयाची १० वर्षांपासूनची स्थिती आहे.वीजबिल,घरपट्टी, देखभाल दुरुस्तीचा खर्च उत्पन्ना हून अधिक असल्याने या सभा गृहाचा ना शासनाला फायदा ; ना नागरिकांना फायदा अशी स्थिती झालेली आहे.

💢 स्लाॅट पध्दतीने नाट्यगृह उपलब्ध करावे

      पुण्यात ज्या पद्धतीने नाटकाचे तीन तास,त्या अगोदर व नंतरचा दीड तास या पद्धतीने सहा तासांच्या स्लॉटवर नाट्यगृह उपलब्ध करून दिले जाते,त्याच प्रमाणे बारामतीतही कविवर्य मोरोपंत नाट्यगृह दिले,तर त्याचा किमान वापर तरी सुरू होईल. याचा शासन स्तरावर निर्णय होणे गरजेचे आहे.

 ♦ किरण गुजर

- अध्यक्ष,नटराज नाट्य कला मंडळ बारामती