ऑगस्ट महिना संपायला ६ दिवस बाकी... लाडक्या बहिणीचा हप्ता कधी जमा होणार?

ऑगस्ट महिना संपायला ६ दिवस बाकी... लाडक्या बहिणीचा हप्ता कधी जमा होणार?

 

लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे हा हप्ता कधी जमा होईल, याची वाट महिला पाहत आहेत. यासंदर्भात सध्या विविध चर्चांना उधाण आले आहे.

ऑगस्ट महिना संपायला आता फक्त सहा दिवस उरले आहेत, तरीही हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे मागील काही महिन्यांप्रमाणे यावेळीही हप्ता लांबणीवर पडणार का, असा प्रश्न महिलांना पडला आहे. ऑगस्टच्या हप्त्याची रक्कम महिन्याच्या अखेरीस खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वीही अनेकदा हप्ता जमा होण्यास विलंब झाला आहे. जर महिन्याच्या अखेरीस पैसे जमा झाले नाहीत, तर हा हप्ता पुढील महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते एकत्र जमा होतील का, असा प्रश्नही महिलांकडून विचारला जात आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, काही अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे नंतर समोर आले. सध्या अशा महिलांची तपासणी सुरू आहे, ज्यामुळे हप्ता जमा होण्यास उशीर होत असल्याची चर्चाही आहे.

महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत 40 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्याची माहिती आहे. यात 14 हजार पुरुषांनी लाभ घेतल्याचं पुढे आहे. याशिवाय 2 हजार 289 सरकारी नोकरदार, 2 लाख 32 हजार संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी, 1 लाख 10 हजार 65 वर्षांवरील महिला, 4 लाख एका कुटुंबातील महिला, सव्वादोन लाख चारचाकी वाहन असलेल्या महिला या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती आहे.