ऑटो रिक्षा चालकांसाठी बारामती राज्य परिवहन  कार्यालयाचे स्तुत्य उपक्रम

ऑटो रिक्षा चालकांसाठी बारामती राज्य परिवहन कार्यालयाचे स्तुत्य उपक्रम

 

बारामती :- बारामती ऑटो रिक्षा महासंघाचे वतीने नुकतेच शहरातील २५ ऑटो रिक्षांचे योग्यता प्रमाणपत्र (ग्रुप पासिंग) करण्यात आले होते त्या सर्व ऑटो रिक्षांचे योग्यता प्रमाणपत्र सोमवार दि.२५ ला दुपारी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात उप प्रादेशिक कार्यालयाचे अधिकारी सुरेंद्र  निकम यांच्या हस्ते २५ ऑटो रिक्षा चालकांना देण्यात आले. 

यावेळी उपप्रादेशिक परि वहन अधिकारी सुरेंद्र निकम, सहकारी मोटार वाहन निरीक्षक चंद्रमोहन साळोखे,वैभव जाधव,सहा.मोटार वाहन निरीक्षक-संजय भापकर,सागर ठेंगल,मोहन भापकर तसेच बारामती शहर व तालुका ऑटो रिक्षा महासंघाचे अध्यक्ष प्रशांत (नाना)सातव,पदाधिकारी किशोर कांबळे,अशोक कांबळे, दादा शिंदे यांच्यासाह बारामती टिपर वाहतुक संघटनेचे कार्या ध्यक्ष नितीन मोहिते,उपाध्यक्ष किरण देशमुख,सचिव बाळराजे कुंभार,बारामी मोटार वाहन संघटनेचे प्रतिनिधी शाकीर बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित रिक्षा चालकांना मार्गदर्शन करतांना निकम म्हणाले सध्या शहरात वाहनांच्या संख्येत झापाट्याने वाढ होताना दिसत आहे. आणि त्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसें दिवस वाढतांना दिसत आहे.तरी सर्व रिक्षा चालकांनी वाहतुकीचे नियम पाळणेबाबत, प्रवाशांबरोबर सौजन्याने वागणे बाबत तसेच आपापल्या गाडींचे पेपर,लायसेन्स,बॅच,परमिट या बद्दल जागरूक राहून सर्व कागदपत्रांची पुर्तता करण्याचे आवाहन केले. 

बारामतीतील रिक्षा चालकांचे कौतुक करून सुरेंद्र निकम म्हणाले एकाचवेळी २५ रिक्षा चालकांनी ग्रुपपासिंग करून चांगला उपक्रम राबविल्याने समाधान व्यक्त केले.इथून पुढेही सर्व रिक्षा चालकांनी अशाप्रकारे ग्रुप पासिंग करून आपापल्या वाहनांची कागदपत्राची पूर्तता  करावी. या चांगल्या उपक्रमास बारामती आरटीओ कार्यालयही आपणास योग्य ते सहकार्य करेल असेही निकम यांनी सांगितले. 

दरम्यान ऑटोरिक्षा महासंघाचे अध्यक्ष प्रशांत नाना सातव म्हणाले शहरातील ऑटो रिक्षांसाठी निश्चित थांबा नसल्याने चालकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यांच्यासाठी निश्चित थांबा उपलब्ध करण्यासाठी आपण पुढाकार घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे यावेळी अधिकारी निकम यांना सांगितले.

रिक्षा चालकांना फक्त शास कीय फी स्विकारून  कौशल गांधींनी ऑनलाईन कागदपत्रे काढण्याकामी मोलाची मदत केल्याने त्यांचे कौतुक करून सुरेंद्र निकम [उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती] यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रम यशस्वी पणे पार पडण्याकरता प्रा.डॉ. भीमराव मोरे,सचिव-बारामती- दौंड-इंदापूर रिक्षा कृती समिती, किशोर कांबळे,अशोक कांबळे, दादा शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले.