
बारामती गणेश फेस्टिव्हलमध्ये कार्यक्रमांची रेलचेल
बारामती:- गणेशोत्सवाचे निमित्त यंदाच्या बारामती गणेश फेस्टिव्हलमध्ये रसिक बारामती करांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सांस्कृतिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फेस्टिव्हलचे प्रमुख नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी दिली.
या वर्षीच्या बारामती गणेश फेस्टिव्हलच्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनेत्रा पवार या उभयतांच्या हस्ते बुधवार २७ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता नटराज नाट्य कला मंदिर येथे केली जाणार आहे.यंदा २७ ऑगस्ट रोजी सप्तरंगधनू हा नृत्य, नाटिका,गीते,२८ रोजी निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन,२९ रोजी आमने सामने विनोदी कार्यक्रम,३१ रोजी हिंदी चित्रपट गीतांचा ऑर्केस्ट्रा टोटल म्युझिक धमाका,१सप्टेंबर रोजी बॉलिवूड आयकॉन्स ही सुपर हिट गाण्यांची मैफल,२ रोजी गुलजार यांच्या गीतांवर आधा रित हिंदी गीतांचा कार्यक्रम,३ रोजी मराठी गीतांचा "स्वर आले जुळूनी" हा कार्यक्रम तर ४ रोजी मराठी लावणी नृत्याचा तुमच्यासाठी कायपण हा कार्यक्रम होमार आहे.५ रोजी पैठणीचा खेळ महिलांसाठी दुपारी ४ ते ६ होणार असून त्याच दिवशी स्थानिक कलावंताचा कऱ्हेचे कलावंत हा कार्यक्रम सादर होईल.
शनिवार ६ सप्टेंबर रोजी पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जनाची मिरवणूक निघणार असल्याची माहिती किरण गुजर यांनी दिली.मनोरंजनाचे कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजता नटराज नाट्य कला मंदिर तिरंगा सर्कल येथे होणार असून ते बारामती करांसाठी मोफत खुले आहेत.