
दौंड भूमी अभिलेखमध्ये 'लाचलुचपत'च्या कारवाईने खळबळ; महिला भूमापकरचा खासगी सहायकाला लाच घेताना अटक
बुधवार, २० ऑगस्ट, २०२५
Edit
दौंड: दौंड भूमी अभिलेख कार्यालयातील महिला भूमापकर
वैशाली घसकटे यांनी तक्रारदारांना त्यांच्या जागेचे 'क' पत्रक व त्याचा
तक्ता तयार करून देण्याकरिता १४ हजार रुपयांची लाच मागितली होती.
तडजोडीअंती दहा हजार रुपये वैशाली घसकटे यांचे खासगी सहाय्यक फय्याज शेख हे
स्वीकारत असताना त्यांना बुधवारी (दि.२०) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या
अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे दौंड शहरात मोठी खळबळ उडाली
आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.