'कास पठारावर बहरले रानहळदीचे गालिचे'; इतर फुलेही लागली दिसू, वन समितीकडून हंगामाचे नियोजन सुरू
रविवार, १० ऑगस्ट, २०२५
Edit
कास : जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावर
नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांच्या कळ्या उमलण्यास प्रारंभ होऊ लागला आहे.
पांढऱ्या रंगाची रानहळद (चवर) पठारावर बहरली आहे. त्यांच्या जोडीला इतर
फुलेही तुरळक प्रमाणात दिसू लागल्याने कासच्या फुलोत्सवाची चाहूल लागली
आहे. सद्यःस्थितीत परिसरात पावसाच्या हलक्या सरी, धुके असे वातावरण आहे.
मे महिन्यांपासून सतत पडणारा पाऊस आणि दाट धुके यामुळे वातावरण प्रतिकूल होऊन फुलांना चांगला बहर येत नाही. सद्यःस्थितीत पांढऱ्या रंगाच्या चवर (रानहळद) या फुलांनी कास पठार बहरले आहे. काही ठिकाणी त्याचे गालिचे पाहायला मिळत आहेत.
वातावरण असेच अनुकूल राहिल्यास गेंद, तेरडा, सीतेची आसवे, टुथब्रश, नीलिमा, रान हळद आदी विविध दहा ते पंधरा जाती प्रजातींच्या रंगीबेरंगी फुलांचे आगमन लवकरच होणार आहे. उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी नुकतीच कासला भेट देऊन कास पठाराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कार्यकारी समितीसह वन विभागाला हंगामाच्या तयारीची सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
असून, १५ ते २० ऑगस्टदरम्यान फुलांचे प्रमाण चांगले असल्यास हंगाम सुरू करण्यात येईल.
- प्रदीप कदम, उपाध्यक्ष, कास समिती.