
लंडन येथील शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
महाराष्ट्र शासनातर्फे ज्या मध्यस्थाने हा लिलाव जिंकला, त्यांना लंडन येथे प्रत्यक्ष भेटून कायदेशीर बाबी पूर्ण करुन आज आशिष शेलार यांनी ही तलवार ताब्यात घेतली. "अशाप्रकारे परदेशात गेलेली ऐतिहासिक वस्तू लिलावात जिंकून मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली. अनेक पराक्रमांची साक्षीदार असलेली ही ऐतिहासिक तलवार ताब्यात घेण्याचे भाग्य मला लाभले, हा तमाम महाराष्ट्राचा हा एक ऐतहासिक विजय आहे", असे आशिष शेलार म्हणाले. तलवार त्याब्यात घेताना, लंडनमधील मराठी नागरिकही मोठया संख्येने उपस्थित होते. त्यांनी जल्लोष साजरा केला.
सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करुन ही तलवार सोमवारी १८ ऑगस्टला सकाळी १० वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर दाखल होईल. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत बाईक रॅली काढून वाजतगाजत ही तलवार दादरच्या पु. ल. देशपांडे कला अकदमीमध्ये आणण्यात येणार आहे.