
जिल्हा माहिती अधिकारी पदी युवराज पाटील रुजू
शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०२५
Edit
पुणे :- पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून युवराज पाटील यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला.यावेळी माहिती अधिकारी सचिन गाढवे यांनी त्यांचे स्वागत केले.
श्री.पाटील यांनी यापूर्वी सहाय्यक संचालक मंत्रालय, सहाय्यक संचालक विभागीय माहिती कार्यालय,पुणे तर अकोला,वाशिम,सातारा,लातूर आणि जळगाव येथे जिल्हा माहिती अधिकारी या पदावर काम केलेले आहे.
जिल्हा माहिती कार्यालया मार्फत शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणारे महत्वाचा दुवा मानला जातो.शासनाची ध्येय धोरणे व जनहिताचे कार्यक्रम प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठीक प्रयत्नशील राहीन,असेही श्री.पाटील म्हणाले.
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.