संकट आल्यावर आम्ही पंचांग काढून बसलो नाही..... उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला

संकट आल्यावर आम्ही पंचांग काढून बसलो नाही..... उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला

 

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट असल्यांचा सांगितलं. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जातून बाहेर काढण्याची हीच खरी वेळ आहे असं देखील सांगितलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, 'मी संजय राऊत, अंबादास दानवे, ओमराजे, कैलास आणि सर्व शिवसैनिकांनी एक दिवस मराठवाड्याच्या शेतकऱ्यांची भेट घेतली. आताची परिस्तिथी भयानक आहे..अजूनही काही भागात जोरात पाऊस सुरु आहे हातात आलेल्या शेतकऱ्याचा घास गेलेला आहे. हा शेतकऱ्यांचाच नाही तर आपला देखील घास गेला. त्याचं अख्ख आयुष्य वाहून गेलं. त्यात त्यांच्या डोक्यावर कर्ज आहे.'

उद्धव ठाकरे पुढं म्हणाले, 'हिचं खरी वेळ आहे या कर्जतून त्यांना बाहेर काढा. आता दिलेली मदत ही तुटपुंजी आहे. दिलेली मदत पाहिली तर आठ दहा हजार फक्त साफसफाई करण्यासाठीच जातील, त्यानंतर शेतकरी पीक काढायला घेईल. त्यांनी १४ हजार कोटींची जाहीर केलेली मदत अजून पोहचलेली नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी.

यानंतर ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर वेळकाढूपणावरून टोलेबाजी देखील केली. ते म्हणाले, आम्ही सत्तेत होतो त्यावेळी ज्यावेळी संकट आलं त्यावेळी आम्ही पंचांग काढत बसलो नाही.' ठाकरे यांनी पंजाब सकराचं देखील उदाहरण दिलं. त्याचबरोबर त्यांनी फडणवीस यांच्या पंतप्रधानांसोबतच्या भेटीवरून देखील टोला हाणला. चर्चा काय करताय अन् प्रस्ताव काय देताय सगळं समोर दिसतंय थेट मदत करा असंही ते म्हणाले.