
गिरीश महाजन यांचं वक्तव्य; “विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना आपल्या पक्षात घ्या..”
गेल्या काही दिवसांपासून भाजपात येणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढते आहे. अनेक नेते पदाधिकारी भाजपात प्रवेश करत आहेत असं दिसून येतं आहे. या पक्ष प्रवेशांवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात घ्या, कुणाच्याही पक्ष प्रवेशाला विरोध करू नका, असा सल्ला महाजन यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. जळगावच्या जामनेरमध्ये पक्षाच्या जिल्हा कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
काय म्हणाले गिरीश महाजन?
मंत्री गिरीश महाजनांनी जळगावच्या जामनेरमध्ये पक्षाच्या जिल्हा कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात घ्या, कुणाच्याही पक्ष प्रवेशाला विरोध करु नका, असा सल्ला यावेळी महाजन यांनी दिला. गिरीष महाजन हे भाजपचे बड नेते समजले जातात. ते भाजपचे संकटमोचक म्हणून देखील ओळखले जातात. त्यांच्या माध्यमातून अनेक नेत्यांनी यापूर्वी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, अशातच आज त्यांनी विरोधकांना आपलसं करुन घ्यावे असे सल्ला दिला आहे. विरोधकांची तोडं बंद करा आणि त्या पक्षात घ्या असा सल्ला त्यांनी दिली आहे. त्यामुळं आगामी काळात नेमका कोणाचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार-महाजन
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढणार आहोत. त्यामुळं एक सुद्धा जागा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला मिळता कामा नये असे महाजन म्हणाले. विरोधकांची तोडं बंद करायची आहेत. त्यामुळं त्यांना आपल्याकडे घ्यायचं आहे असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले. दुसऱ्या पक्षातला नेता, कार्यकर्ता कसाही असूद्या पण कामाचा माणूस आहे असे महाजन म्हणाले. कितीतरी लोक आपल्यावर टीका करणारे होते पण आज ते आपल्याकडे आले असल्याचे गिरीश महाजन म्हणाले. जो या पक्षामध्ये काम करेल त्याला पक्षात किंमत आहे. फक्त फोटोबाजी करणाऱ्याला किंमत नाही असंही महाजन म्हणाले. कार्यकर्ता छोटा जरी असला तरी त्याला पक्षात घ्या असा सल्ला महाजन यांनी दिला. त्याचे स्वागत करा असे ते म्हणाले. गिरीश महाजन हे भाजपचे बड नेते समजले जातात. ते भाजपचे संकटमोचक म्हणून देखील ओळखले जातात. त्यांच्या माध्यमातून अनेक नेत्यांनी यापूर्वी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आगामी काळात नेमके कोण-कोणत्या पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे भाजपात येतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.