'पुणे जिल्ह्यातील 15 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या'; बदलीच्या ठिकाणी त्वरित हजर होण्याचे पोलिस अधीक्षकांचे आदेश

'पुणे जिल्ह्यातील 15 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या'; बदलीच्या ठिकाणी त्वरित हजर होण्याचे पोलिस अधीक्षकांचे आदेश

 

बारामती : प्रशासकीय निकड व जनहित विचारात घेत पुणे जिल्ह्यातील 15 पोलिस निरिक्षक व सहायक पोलिस निरिक्षकांच्या पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी बदल्या केल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या बदल्या झाल्या असल्याची चर्चा आहे. यात ज्या ठराविक अधिका-यांची कामगिरी सुमार होती त्यांनाही पोलिस अधीक्षकांनी दणका दिल्याचे मानले जात आहे. सर्व अधिका-यांनी बदलीच्या ठिकाणी त्वरित हजर होण्याचे आदेशही पोलिस अधीक्षकांनी दिलेले आहेत.

या बदल्यांची रचना पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे. पोलिस निरिक्षक- कुमार रामचंद्र कदम- वडगांव मावळ पोलीस ठाणे ते सासवड पोलीस ठाणे, पोलिस निरिक्षक- सचिन दत्तात्रय वांगडे हवेली पोलीस ठाणे ते उरळीकांचन पोलीस स्टेशन, पोलिस निरिक्षक - रविंद्र दत्तात्रय पाटील-कामशेत पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष, पुणे ग्रामीण, सहायक पोलिस निरिक्षक महादेव चंद्रकांत शेलार- नारायणगाव पोलीस ठाणे ते स्थानिक गुन्हे शाखा.

खालील नमूद पोलीस अधिकारी यांचा सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणी विहित केलेला दोन वर्षे सेवा कालावधी पूर्ण झाला नसून, मुदतपूर्व विनंती बदलीच्या अनुषंगाने प्रशासकीय निकड व जनहित लक्षात घेऊन नमूद अधिकारी यांची खालीलप्रमाणे तात्पुरत्या स्वरुपात पुढील आदेशापर्यंत मुदतपूर्व बदली / पदस्थापना करण्यात आली आहे.

पोलिस निरिक्षक अभिजीत सुभाष देशमुख- परकीय नागरिक नोंदणी कक्ष ते वडगाव मावळ पोलीस ठाणे, पोलिस निरिक्षक वैशाली रावसाहेब पाटील बारामती तालुका पोलीस ठाणे ते हवेली पोलीस ठाणे, पोलिस निरिक्षक शंकर मनोहर पाटील-उरळीकांचन पोलीस ठाणे ते कामशेत पोलीस ठाणे, पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव- बारामती वाहतुक शाखा ते बारामती तालुका पोलीस ठाणे, पोलिस निरिक्षक- श्रीशैल रामचंद्र चिवडशेटटी- नियंत्रण कक्ष, पुणे ग्रामीण ते बारामती बाहतुक शाखा, पोलिस निरिक्षक पोनि ऋषिकेश भाऊसाहेब अधिकारी- सासवड पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष, पुणे ग्रामीण, सहायक पोलिस निरिक्षक- नितीन हनुमंत खामगळ- वेल्हा पोलिस ठाणे ते नियंत्रण कक्ष, पुणे ग्रामीण, सहायक पोलिस निरिक्षक- प्रविण महादेव सपांगे- यवत पोलीस ठाणे ते नारायणगाव पोलीस ठाणे, सहायक पोलिस निरिक्षक किशोर विठठल शेवते- वाचक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालय, पुणे ते वेल्हा पोलीस ठाणे, सहायक पोलिस निरिक्षक- गजानन रतन चेके वाचक, उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती ते नीरा - नृसिंहपुर पोलीस ठाणे ( नियोजित पोलीस ठाणे कार्यान्वित झाल्यानंतर).