
शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त मंडळ जाहीर; खासदार शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली सन २०२५–३० साठी केल्या नियुक्त्या
सोमवार, १३ ऑक्टोबर, २०२५
Edit
माळेगाव : येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी सन २०२५–२०३० या कालावधीसाठीचे नवीन विश्वस्त मंडळ जाहीर केले आहे. मंडळाचे सचिव डॉ.धनंजय ठोंबरे यांनी ही माहिती दिली.शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळाच्या नव्या विश्वस्त मंडळात विविध गटांतील प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. नियुक्त सदस्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
गटनिहाय विश्वस्त सदस्य :
– माळेगाव गट : राजेंद्र दौलतराव काटे, माळेगाव
– पणदरे गट : धन्यकुमार सदाशिव जगताप, पणदरे
– सांगवी गट : विराज धैर्यवान खलाटे, कांबळेश्वर
– खांडज-शिरवली गट : प्रवीण हरिभाऊ पोंदुकुले, शिरवली
– निरावागज गट : रोहन हनुमंत देवकाते, निरावागज
– बारामती गट : डॉ. मोहन दत्तात्रेय नेवसे, बारामती
निमंत्रित सदस्य :
– गणपतराव शंकर देवकाते, निरावागज
– आशा नितीन जराड, उंडवडी
मानद सदस्य :
– निलेश अशोकराव नलावडे, सी.ई.ओ., अँग्री. डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर
या नव्या विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून संस्थेच्या शैक्षणिक कार्यात अधिक गतिमानता येईल, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास सचिव डॉ.धनंजय ठोंबरे यांनी व्यक्त केला.