पंतप्रधान मोदी आज मुंबईत, नवी मुंबई विमानतळ व मेट्रो ३ च्या अंतिम टप्प्याचं लोकार्पण करणार

पंतप्रधान मोदी आज मुंबईत, नवी मुंबई विमानतळ व मेट्रो ३ च्या अंतिम टप्प्याचं लोकार्पण करणार

 

नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज (बुधवार, ८ ऑक्टोबर) उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होणार असून यानिमित्त मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री उपस्थित असतील. या कार्यक्रमावर आपलं लक्ष असेल. या कार्यक्रमात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा, भाषणांचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

दुसऱ्या बाजूला, शिवसेना पक्षाच्या निवडणूक चिन्हावरून दोन्ही गटांमध्ये (ठाकरे व शिंदे) चालू असलेल्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं याचा निर्णय आज होऊ शकतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडेही आपलं लक्ष असेल. यासह राज्याच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वक्तव्यांचा आढावा आपण घेणार आहोत.