शेतकरी महिलांना आत्मनिर्भरतेचे धडे; मेखळीत मोठा प्रतिसाद : कृषी क्षेत्रात सहभाग वाढला

शेतकरी महिलांना आत्मनिर्भरतेचे धडे; मेखळीत मोठा प्रतिसाद : कृषी क्षेत्रात सहभाग वाढला

 

बारामती :- आयटीसी मिशन,सुनहरा कल, डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर संस्था, हनुमान पाणी वापर संस्था मेखळी व धर्मराज पाणी वापर संस्था मेखळी यांच्या वतीने शेतकरी महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास शेतकरी महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेतकरी महिलांचे योगदान मोलाचे असून त्यांना यावेळी आत्मनिर्भरतेचे धडे देण्यात आले.

अध्यक्षस्थानी माजी सरपंच बापूराव देवकाते हे होते. प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक कृषी अधिकारी माधुरी पवार, समुदाय आरोग्य अधिकारी सोनाली सामसे, प्रमुख पाहुणे सिंचन शाखेचे शाखाधिकारी अभिजीत वायसे,ग्राम महसूल* अधिकारी नूतन ननवरे, सरपंच मनीषा इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.महिलांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन,महिला बचत गटांच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेचे महत्त्व, आरोग्य विषयक माहिती, महसूल विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन व तसेच अन्न धान्य बीज प्रक्रियाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविले गेले.महिला सक्षमीकरण,ग्रामीण अर्थव्यवस्थेतील महिलांचे योगदान याविषयी मान्यवरांनी विचार व्यक्त केले.शेतकरी महिलांच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. खरेदी-विक्री संघाची संचालक रमेश देवकाते यांनी शेती औषध विभागाच्या औषधांचे विषयी माहिती दिली.कार्यक्र मास उत्तम देवकाते,विलास देवकाते,संजय देवकाते, सचिन देवकाते,सुनिता देवकाते,निर्मला माने,शिल्पा जौंजांळ,नारायण तुपे,महादेव देवकाते,अरुण देवकाते, एकनाथ चोपडे,दोन्ही संस्थांचे संचालक मंडळ,सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते

माजी सरपंच बापूराव देवकाते म्हणाले की, शेतकरी महिला म्हणजे आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यांच्या सहभागा शिवाय विकास शक्य नाही. शेतकरी महिला सक्षम झाल्याशिवाय गाव,जिल्हा, राज्य,देश सक्षम होऊ शकणार नाही,यासाठी महिला शेतकरी सक्षम झाल्या पाहिजेत,असे सूचित केले.