नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ऑर्बिटर जे जे टीव्हीएस शोरूममध्ये दाखल

नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ऑर्बिटर जे जे टीव्हीएस शोरूममध्ये दाखल

 

बारामती :- भारतातील सर्वाधिक इलेक्ट्रिक दुचाकी विक्री करणारी टीव्हीएस मोटर कंपनीने IQUBE या दुचाकीच्या यशानंतर "ऑर्बिटर" नावाने नवीन इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीस उपलब्ध केलेली आहे या नवीन दुचाकीचे बारामती येथील जे जे टीव्हीएसच्या दालनामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच अनावरण करण्यात आले.

    'टीव्हीएस ऑर्बिटर' मध्ये 158 किलोमीटर क्षमता,क्रूझ कंट्रोल,३४ लिटर बूट स्पेस, हिल होल्ड आदी प्रगत कनेक्टेड फीचर्सचा प्रथमच या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.

    या दुचाकीमध्ये एअरो डायनेमिक कार्यक्षमता, कनेक्टेड मोबाइल ॲप,फ्रंट व्हिझरसह फ्रंट एलईडी हेडलॅम्प,इनकमिंग कॉल डिस्प्ले,रंगीत एलसीडी कनेक्टेड क्लस्टर,यूएसबी २.०चार्जिंग आणि १६९ मिलिमीटर ग्राउंड क्लिअरन्स आहे.पीएम ईं-ड्राईव्ह योजने सह ही स्कूटर ग्राहकांना ९४,९९९*  रुपये या आकर्षक किमतीमध्ये मिळणार आहे.

     अनावरण कार्यक्रमाप्रसंगी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी श्री.सुरेंद्र निकम हे  उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले,"येणाऱ्या काळामध्ये पृथ्वीवरील पर्यावरण स्वच्छ राहण्याकरिता इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचा वापर वाढविणे गरजेचे आहे आणि सन २०३२ पर्यंत मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक दुचाकी चा वापर केला जाईल.सर्व नागरिकांनी या दिशेने छोटासा सहभाग म्हणून जास्तीतजास्त इलेक्ट्रिक वाहने वापरली पाहिजेत" असे मत व्यक्त केले. 

     याप्रसंगी बारामती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री.नामदेव जी तुपे, बारामतीतील प्रसिद्धउद्योजक श्री.अजितशेठ वडूजकर, औषध व्यावसायिक श्री. शैलेश शहा आदी उपस्थित होते.टीव्हीएस कंपनीचे टेरिटरी सेल्स मॅनेजर श्री वैभवसर म्हणाले, "ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षांनुसार, 'ऑर्बिटर'च्या माध्यमातून शहरी प्रवास अधिक आरामदायी,सहज सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न आहे.प्रगत तंत्रज्ञान,वाढीव एरोडायनॅमिक कार्यक्षमता, आराम आणि सेगमेंट फर्स्ट वैशिष्ठ्यांसह 'ऑर्बिटर' बाजार पेठेत नवे मापदंड स्थापित करेल असा आम्हांला विश्वास आहे.

    ग्राहकांनी शोरूमला यावे व गाडीची टेस्टराईड घेऊन आपली गाडी बुक करावी असे आवाहन शोरूमचे मालक श्री. विपुल जयकुमार शहा (वडूजकर) यांनी केले आहे.