
खासदार सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिला कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप..!
खासदार सुनेत्रा पवार यांचा वाढदिवस राष्ट्रवादी शहर पक्ष कार्यालयात साजरा..!
बारामती :- गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी याकरिता राज्यसभा खासदार सुनेत्रा वहिनी पवार यांच्या वाढदिवसा निमित्त महिला सफाई कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप केल्याची माहिती बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष जय पाटील यांनी दिली.
राज्यसभा खा.सुनेत्रावहिनी पवार यांचा वाढदिवस बारामती शहर राष्ट्रवादीकाँग्रेस पक्षाचे कार्यालयात शनिवार दि.१८ रोजी साजरा करण्यात आला.यावेळी बारामती नगर परिषदेच्या आरोग्य विभागा मधील सफाई महिला कर्मचा ऱ्यांना वाढदिवसा निमित्त मिठाई वाटप करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
या प्रसंगी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जयपाटील,महिलाशहराध्यक्षा अनिता गायकवाड,युवक अध्यक्ष अविनाश बांदल, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, प्रा. आदिनाथ चौधर,मा.नगरसेवक कुंदन लालबिगे,दिनेश जगताप, आदित्य हिंगणे,पार्थ गालिंदे, रियाज शेख,विशाल खंडाळे, सुरज देवकाते याचेसह अनेक मान्यवर,महिला पदाधिकारी उपस्थित होते.