पवारांचा दिवाळी पाडवा या वर्षी नाही; खा.शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघांनी कले स्पष्ट
बारामती :- बारामतीत दरवर्षी पवार कुटुंबीय दोन्ही पवार परिवा दिवाळी पाडव्याचे आयोजन केले जाते. यानिमित्त राज्यभरातील पदाधिकारी, अन्य मंडळी बारामतीत पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी आवर्जून येत असतात. यंदा कुटुंबात घडलेली दुःखद घटना आणि राज्यात महापुराने निर्माण केलेली स्थिती, यामुळे दिवाळी पाडवा कार्यक्रम साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाने गोविंदबागेतील दिवाळी पाडवा होणार नसल्याची माहिती दिली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही माध्यमांशी बोलताना
यंदा पाडवा कार्यक्रम होणार नसल्याचे स्पष्ट केले. पवार कुटुंबीयांचा दिवाळी पाडवा ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी यापूर्वी होत होता. पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीचे दोन भाग झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून काटेवाडीत स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. यंदा दोन्ही पवारांकडून पाडव्याचा कार्यक्रम घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.