माळेगाव नगरपंचायतीसाठी उमेदवारांना चिन्ह वाटप
माळेगाव: माळेगाव नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीची तयारी जोरात सुरू असून आज निवडणूक कार्यालयात उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. या प्रक्रियेमुळे निवडणूक च्या वातावरणाला अधिक रंग चढला असून स्पर्धा चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अपक्ष उमेदवारांसह विविध पक्षांच्या इच्छुकांनी चिन्हासाठी अर्ज दाखल केले होते. लॉटरी पद्धतीनुसार अनेकांना त्यांच्या अपेक्षित चिन्ह मिळाले.जनमत विकास आघाडी च्या उमेदवारांना कप-बशी,आणि अपक्ष उमेदवारांना पाण्याचा जग,ॲप्पल,गॅस सिलेंडर,सिलिंग फॅन,अंगठी,छत्री,किटली,टीव्ही,शिट्टी,रिक्षा, ट्रॅक्टर,बस,लॅपटॉप, टोपी आणि बादली यांसारख्या विविध चिन्हांचा समावेश होता.
उमेदवारांना मिळालेल्या चिन्हांमुळे समर्थकांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. काहींनी आपल्या प्रचाराची दिशा व रणनीतीही तत्काळ ठरवण्यास सुरुवात केली.
चिन्ह वाटपानंतर आता उमेदवार प्रचाराला वेग देतील.
नगरपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे आणि नियमांनुसार पार पाडल्याचे सांगितले. यामुळे
आता माळेगावमध्ये निवडणुकीची जोरदार रंगत पाहायला मिळणार आहे.