तांदुळवाडी मध्ये काजळेचा मटका व्यवसाय बिट अंमलदार यांच्या आर्शिर्वादाने सुसाट सुरु?; नवनिर्वाचीत कर्तव्यदक्ष प्रभारी अधिकारी कारवाई करणार का? या कडे नागरीकांचे लक्ष!

तांदुळवाडी मध्ये काजळेचा मटका व्यवसाय बिट अंमलदार यांच्या आर्शिर्वादाने सुसाट सुरु?; नवनिर्वाचीत कर्तव्यदक्ष प्रभारी अधिकारी कारवाई करणार का? या कडे नागरीकांचे लक्ष!

 

बारामती: तांदुळवाडी मध्ये मटका व्यावसाय बिट आमलदार कर्मचारी यांच्या आर्शिर्वादाने चालु असल्याचे चौका चौकात चर्चा आहे! हा मटका व्यवसाय काजळे नावाच्या इसमाचा असल्याचे नागरीक बोलत आहेत ! बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील तांदुळवाडी गाव येते व हे गाव विषेश मटक्याचे महाकेंद्र बनले असल्याचे दिसुन येत आहे? काजळे या इसमाचा तांदळवाडी सह अनेक गावात, शहराच्या काही भागात मटक्याचा शिरकाव केला आहे? या काजळेचा मोठ्या प्रमाणात मटका व्यवसाय निर्भिडपणे चालुच असल्याचे संपुर्ण तालुक्यात चर्चा आहे. या परीसरातील तरुण पिढी मटक्याच्या सट्टयाच्या दरीत जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. मटक्याचा वाढता व्यवसायामुळे गुन्हेगारी वाढीला कारणीभुत हा व्यवसाय ठरत आहे. कर्तव्यदक्ष नवनिर्वाचीत पोलीस आधिकारी यांनी विषेश लक्ष देऊण हा मटका व्यवसाय बंद करण्या साठी योग्यत्या सुचना कराव्या आशी मागणी नागरीक करीत आहेत. व त्या मटका व्यवसायाकडे जाणुनबुजुन कानाडोळा करणाऱ्या बिटआमलदारावर ही कारवाई व्हावी अशी मागणि नागरीक करीत आहेत.!