बारामती नगरपरिषद निवडणुक - राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गटाचे ) ८ उमेदवार बिनविरोध
बारामती:- बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. बारामतीत राष्ट्रवादीचे आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळं राष्ट्रवादीच्या विजयाची ही नांदी असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी दिली आहे.
बारामती नगरपरिषदेच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये अनुप्रिता डांगे, अश्विनी सुरज सातव, शर्मिला शिवाजीराव ढवाण, अभिजीत जाधव, धनश्री अविनाश बांदल, किशोर मासाळ, श्वेता योगेश नाळे, आफरीन फिरोज बागवान यांचा समावेश आहे. या निवडीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला..
बारामतीत राष्ट्रवादीने मिळवलेल्या या यशानंतर ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी समाधान व्यक्त केलं. अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतली आहे. ही विजयाची सुरुवात असून निवडणुकीतही राष्ट्रवादीचा एकतर्फी विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांनीही बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांचं अभिनंदन करत राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.