गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
अनंत गर्जे यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना वरळी पोलिस स्थानकात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आज त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. अनंत गर्जेंच्या पत्नी गौरी पालवे-गर्जे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जेंवर केला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी आज अनंत गर्जेंना कोर्टात पोलीस कोठडीसाठी हजर करण्यात आले. कोर्टाने अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या चार दिवसांच्या पोलिस कोठडीच्या चौकशीतून पोलिसांना काय नवी माहिती मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
वरळी पोलीस ठाण्यात कुटुंबीयांनी केलेला आक्रोश
शनिवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. गौरी पालवे यांच्या कुटुंबीयांनी थेट मुंबईतील वरळी पोलीस ठाणे गाठले आणि अनंत गर्जेंसह त्याच्या कुटुंबीयांवरही हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कुटुंबीय या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेताना दिसले. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ते पोलीस ठाण्यातून हलण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांच्या त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून घेतला.