एमपीएससीची २१ डिसेंबरची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे जाणार? काय म्हणाले अधिकारी ?...
नागपूर: नगर परिषदा व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील झालेल्या प्रकरणांसंदर्भात २३ नोव्हेंबर किंवा त्यानंतर निर्णय आलेल्या २४ अध्यक्षपदांच्या आणि विविध ठिकाणच्या १५४ सदस्यपदाच्या जागांवरील निवडणुकांची प्रक्रिया अपील कालावधीनंतरच्या पुढील टप्प्यापासून सुधारित कार्यक्रमानुसार राबविली जाईल, त्यासाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. उर्वरित अन्य सर्व ठिकाणी नियोजित निवडणूक कार्यक्रमानुसार आज, २ डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. या सगळ्यांचा परिणाम महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या परीक्षांवर होणार आहे का असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे. यावर आयोगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलले असता तर मी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. परीक्षा बद्दल काय होणार ते बघूया.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतर्गत २१ डिसेंबर रोजी राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय), राज्य कर निरीक्षक (एसटीआय) आणि सहायक कक्ष अधिकारी (एएसओ) यासाठी संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाते. राज्यात पोलीस उपनिरीक्षकांची दोन हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. हजारो विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी तयारी करतात. तुला खूप विद्यार्थी या परीक्षेला बसले असताना निवडणूक आयोगामुळे या परीक्षेवर परिणाम होणार. परीक्षा समोर जाणार की त्याच तारखेला होणार असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला आहे.
परीक्षेवर आयोग काय म्हणतो?
संयुक्त परीक्षा यापूर्वीच पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्यामुळे पुन्हा परीक्षा पुढे ढकलने संयुक्त ठरणार नाही असे मत आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आहे. २० डिसेंबरच्या निवडणुका या काहीच मतदार केंद्रावर होणार आहेत. त्याचा परिणाम सर्वत्र पडणार नाही. तसेच मनुष्यबळही कमी लागणारा त्यामुळे २१तारखेला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यावर तूर्तास आयोगातील अधिकारी सकारात्मक नसल्याची माहिती आहे. त्यामुळे परीक्षा २१ डिसेंबरला होण्याची दाट शक्यता आहे.
सुधारित निवडणूक कार्यक्रम