फलटणमध्ये राजे गटाचा पराभव; नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांचा विजय

फलटणमध्ये राजे गटाचा पराभव; नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांचा विजय

 

फलटण: फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युतीने स्पष्ट बहुमत मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. नगराध्यक्षपदी भाजपचे समशेरसिंह नाईक निंबाळकर हे विजयी झाले असून, वर्षानुवर्षे सत्ता असलेल्या राजे गटाला या निवडणुकीत दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

निकालाअंती भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक १२ जागा जिंकल्या आहेत, तर त्यांच्या मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने ६ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे युतीचे एकूण संख्याबळ १८ वर पोहोचले आहे. दुसरीकडे, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील राजे गटाला केवळ ९ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

  • प्रभाग क्र. १
  • अस्मिता भीमराव लोंढे (अपक्ष – राष्ट्रवादी प्रणित)
  • सोमशेठ गंगाराम जाधव (अपक्ष – राष्ट्रवादी प्रणित)
  • प्रभाग क्र. २
  • मीना जीवन काकडे (राष्ट्रवादी)
  • सुपर्णा सनी अहिवळे (राष्ट्रवादी)
  • प्रभाग क्र. ३
  • सचिन रमेश अहिवळे (राष्ट्रवादी)
  • सुलक्षणा जितेंद्र सरगर (भाजपा)
  • प्रभाग क्र. ४
  • रूपाली सूरज जाधव (राजे गट – शिवसेना)
  • पप्पू शेख (राजे गट – शिवसेना)
  • प्रभाग क्र. ५
  • कांचन दत्तराज व्हटकर (भाजपा)
  • रोहित राजेंद्र नागटिळे (भाजपा)
  • प्रभाग क्र. ६
  • किरण देविदास राऊत (भाजपा)
  • मंगलादेवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर (भाजपा)
  • प्रभाग क्र. ७
  • स्वाती राजेंद्र भोसले (भाजपा)
  • पांडुरंग मानसिंगराव गुंजवटे (राजे गट – शिवसेना)
  • प्रभाग क्र. ८
  • विशाल उदय तेली (राजे गट – शिवसेना)
  • कु. सिद्धाली अनुप शहा (भाजपा)
  • प्रभाग क्र. ९
  • कविता श्रीराम मदने (राजे गट)
  • पंकज चंद्रकांत पवार (राजे गट – काँग्रेस)
  • प्रभाग क्र. १०
  • श्वेता किशोर तारळकर (राजे गट – शिवसेना)
  • अमित अशोक भोईटे (भाजपा)
  • प्रभाग क्र. ११
  • संदीप दौलतराव चोरमले (भाजपा)
  • सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले (भाजपा)
  • प्रभाग क्र. १२
  • विकास वसंतराव काकडे (राजे गट – शिवसेना)
  • सौ. स्मिता संगम शहा (राजे गट – शिवसेना)
  • प्रभाग क्र. १३
  • मोहिनी मंगेश हेंद्रे (भाजपा)
  • रूपाली अमोल सस्ते (भाजपा)
  • राहुल अशोक निंबाळकर (राष्ट्रवादी)

फलटण नगरपालिकेत एकहाती सत्ता असलेल्या राजे गटाची या निवडणुकीत मोठी पीछेहाट झाली आहे. नगराध्यक्षपदासह बहुमत गमावल्याने आणि नगरसेवकांची संख्या एक अंकी (९) राहिल्याने हा राजे गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.