येरमाळा पत्रकार संघाच्या वतीने शिलाताई उंबरे यांचा तानुबाई बिर्जे विशेष महिला पत्रकार पुरस्काराने सन्मान
◼️ येरमाळा पत्रकार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने भूमीपुत्रांचा नागरी सत्कार
◼️ पत्रकार संघाच्या वतीने तानुबाई बिर्जे विशेष महिला पत्रकार पुरस्काराचा प्रारंभ
येरमाळा:- (प्रतिनिधी) दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती तथा पत्रकार दिनाचे निमित्त येरमाळा पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्यात तानुबाई बिर्जे विशेष महिला पत्रकार पुरस्काराने धाराशिव येथील सलग तीस वर्षे पत्रकारीता केलेल्या शिलाताई उंबरे यांचा सन्मान सकाळी ११ वाजता येरमाळा पत्रकार बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालित येरमाळा पत्रकार अभ्यासिका कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात करण्यात आला.
येरमाळा पत्रकार बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालित येरमाळा पत्रकार वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त येथील शाळेमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण,आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी रत्नदीप बारकुल निरीक्षक वैद्यमापन शास्त्र (राजपत्रित),वैभव कवडे राज्यकर निरीक्षक अधिकारी,जयदेवी कांबळे पुरवठा निरीक्षक तहसील कार्यालय कळंब,महिला ज्येष्ठ पत्रकार शीला उंबरे,माजी सभापती विकास बारकुल यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंगळवार दि.६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त येरमाळा पत्रकार संघाच्या वतीने विशेष पुरस्काराचे वितरण करण्यात आले असून धाराशिव जिल्ह्या तील महिला पत्रकारिता क्षेत्रातील श्रीमती शीला उंबरे यांना उल्लेखनीय कार्यासाठी तानुबाई बिर्जे महिला पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यापुढेही मराठवाड्या सह राज्यातील महिला पत्रकारांना तानुबाई बिर्जे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.येरमाळा पत्रकार बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालित येरमाळा पत्रकार अभ्यासिका इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुढील काही दिवसां विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही अभ्यासिका उपलब्ध होणार आहे.या कार्यक्रमासाठी सरपंच सौ.प्रिया बारकुल, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर बिराजदार,स.पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव डॉ.पल्लवी तांबारे (संचालक येडाई व्यसनमुक्ती फाउंडेशन), सचिन पाटील (संस्थापक विद्यानिकेतन विद्यालय येरमाळा) प्राचार्य सुनील पाटील ( ज्ञानोद्योग विद्यालय येरमाळा),संतोष तौर,पापा पायाळे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक,पत्रकार,आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता बारकुल यांनी केले,तसेच सूत्र संचालन प्रा.महादेव गपाट यांनी तर सचिन बारकुल यांनी आभार मानले.