‘पुणे ग्रँड टूर’ यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा जिल्हाधिकाडी डुडी यांचे नागरिकांना आवाहन; बारामती, पुरंदरमधील मार्गांची केली पाहणी
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, ‘प्रशासनाने मार्गावर संपूर्ण स्वच्छता राहील, यादृष्टीने स्थानिकांना विश्वासात घेऊन सूक्ष्म नियोजन करावे, प्रशासनासोबत स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, गृहनिर्माण सोसायटी व गणेश मंडळाचे पदाधिकारी, महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, क्रीडा संघटनेचे पदाधिकारी आदी घटकांनी मिळून मोहिमस्तरावर स्वच्छता मोहीम राबवावी. या टप्पाअंतर्गंत येणाऱ्या गावात स्वयंशिस्त पाळत स्पर्धा मार्गाच्या दोन्ही बाजूला उभे राहत महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास, संगीत, वेशभूषा, नाटक, लोकनाट्य आदी माध्यमाद्वारे खेळाडूंचे स्वागत करावे तसेच उत्साह वाढवावा. असे करताना स्पर्धेला अडथळा निर्माण होणार नाही, मार्गावर पाळीव प्राणी येऊ देऊ नयेत, याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल येथील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सासवडचे राजेंद्रसिंह गौर, बारामतीचे तहसीलदार स्वप्नील रावडे उपस्थित होते.