बारामतीत कऱ्हानदी परिसरात स्वच्छ जल, स्वच्छ मन अभियान उत्साहात संपन्न

बारामतीत कऱ्हानदी परिसरात स्वच्छ जल, स्वच्छ मन अभियान उत्साहात संपन्न

 

बारामती:- पाणी हे निसर्गाचे अमूल्य वरदान आहे.जीवनाचा मूला धार आणि मानवसभ्यतेची जीवनरेखा असलेले हे जल स्वच्छ व संरक्षित राहिले,तर केवळ पर्यावरणच नव्हे,तर मानवसमाजाचे एकूण आरोग्य आणि संतुलन अधिक सक्षम होते. याच विचाराला कृतीरूप देत नैसर्गिक जलस्रोत,नद्या, तलाव,सरोवरे आणि समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छता व संवर्धनासाठी उभारलेला व्यापक उपक्रम  जन-माणसा साठी प्रेरणा स्रोत ठरत आहे. ही चळवळ केवळ स्वच्छते पुरती मर्यादित नसून जागरू कता,जबाबदारी आणि सामुहिक सहभागाचा ठोस संदेश देणारी ठरली आहे.

    "स्वच्छ जल,स्वच्छ मन’'या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचे भव्य आयोजन सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या मार्गदर्शनाखाली रवि वार दि.२२रोजी देशातील२५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशां तील ९३० शहरांमधील १६०० हून अधिक ठिकाणी यशस्वीरित्या पार पडले.यात सुमारे १२लाख स्वयंसेवकांनी यात सहभाग नोंदवला. 

    "स्वच्छ जल स्वच्छ मन" प्रोजेक्ट अमृतअंतर्गत बारा मती मधील कऱ्हानदी पात्र परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या मोहिमे त संत निरंकारी मिशन चॅरिटे बल फाउंडेशनच्या बारामती शाखेसह मोरगाव,शेटफळ गढे,मदनवाडी इ.शाखेतील पाचशेहून अधिक अनुयायांनी सहभाग घेतल्याचे सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी सांगितले.

     या अभियानास बारामती नगरपरिषदेचे विद्यमान नगरा ध्यक्ष सचिन सातव,आरोग्या धिकारी यशराज बनसोडे व त्यांचे सहकाऱ्यांनी संत निरं कारी मिशनच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

    या प्रसंगी श्री.सातव म्हणाले हा उपक्रम केवळ पर्यावरणीय प्रयत्न नव्हता; तर अध्यात्म,सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम होता.या माध्यमा तून जनमानसात कर्तव्यभाव आणि जागरूकतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले

     संत निरंकारी मिशनच्या सामाजिक शाखा संत निरंका री चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या पुढाकाराने बाबा हरदेवसिंह जी महाराज यांच्या शिकवणी तून प्रेरणा घेत‘प्रोजेक्टअमृत’ हा उपक्रम राबविण्यात आला. 

    संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी अमृतमय विचार व्यक्त करताना सांगितले की,बाबा जींच्या शिकवणी या केवळ स्मरण करण्याच्या नसून त्या जीवनात अंगीकारण्यासाठी आहेत.खरी श्रद्धांजली ही शब्दांनी नव्हे,तर कृतीतून अर्पण केली जाते.आपण त्यांच्या अनुयायी असल्याचा दावा करीत असू,तर प्रेम, सेवा,करुणा आणि समदृष्टी यांसारख्या मूल्यांचा स्वीकार आपल्या दैनंदिन जीवनात झाला आहे कां ? याचे आत्मपरीक्षण आवश्यक असल्याचे सांगितले.


    स्वच्छता अभियान संपन्न झाल्यावर त्याच ठिकाणी विशाल सत्संगाचेही आयो जन करण्यात आले.त्यामध्ये बाहेरील स्वच्छतेबरोबर मनाच्या आंतरिक शुध्दतेचा महत्वपूर्ण संदेश देण्यात आला.