डोर्लेवाडीत तुकाराम बीज सोहळा साध्या पद्धतीने होणार
◼️अजितदादांचे निधनाचे दुःखद पार्श्वभूमी वर करमणुकीचे कार्यक्रम रद्द
◼️धार्मिक विधी,सप्ताह कार्यक्रम परंपरेप्रमाणेः
बारामती :- तालुक्यातील डोर्लेवाडी येथे दरवर्षी संत तुकाराम महाराज बीज उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.यंदा उत्सवाचे ६७ वे वर्ष आहे. परंतु२८जानेवारी रोजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने महाराष्ट्रात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर ५ मार्च रोजी होणारा बीज सोहळा साधेपणाने साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे.यासा ठी डोर्लेवाडी येथील संत तुकाराम महाराज मंदिरात ग्रामस्थ व उत्सव समितीची बैठक झाली.बैठकीत करमणुकीचे सर्व कार्यक्रम, मुख्य रस्त्यावर उभारण्यात येणारा मंडप,बैलगाडा शर्यत, कुस्ती स्पर्धा आदी उपक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र,धार्मिक कार्यक्रम, सप्ताह व पारंपरिक विधी सालाबाद प्रमाणे होणार असून बीजेनिमित्त मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले राहाणार आहे.