'अजित पवारांच्या चेहऱ्यावर मी पहिल्यांदाच...', भर कार्यक्रमात नाना पाटेकरांनी घेतलेली दादांची फिरकी
मुंबई: नियतीचा खेळ खरोखरच अजब असतो. २८ जानेवारी २०२६ चा तो काळा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धगधगत्या पर्वाचा अंत करून गेला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्य अजूनही सुन्न आहे.
शासकीय इतमामात पार पडलेले अंत्यसंस्कार आणि जनसागराचा तो महापूर दादांच्या लोकप्रियतेची साक्ष देऊन गेला. मात्र, राजकीय गदारोळापासून दूर, कॅमेऱ्यांच्या फ्लॅशलाईटपासून लांब, दादांचा एक असा कोपरा होता जिथे ते फक्त 'अजित' असायचे. तो कोपरा म्हणजे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं घर आणि त्यांची मैत्री.
दोन स्पष्टवक्ते अन् एक घट्ट मैत्री
अजित पवार आणि नाना पाटेकर हे दोन व्यक्ती म्हणजे जणू दोन भिन्न टोकं. पण त्यांच्या स्वभावात एक समान धागा होता, तो म्हणजे कमालीचा स्पष्टवक्तेपणा आणि कामाची शिस्त. नानांना दादांच्या कामाचा उरक आवडायचा, तर दादांना नानांचं समाजकार्य आणि त्यांचा साधेपणा भावयाचा. राजकारणाच्या धावपळीतून थकले-भागले की दादा अनेकदा नानांच्या फार्महाऊसवर पोहोचायचे. तिथे कोणताही प्रोटोकॉल नसायचा, केवळ साध्या जेवणाची ताटं आणि मनापासून मारलेल्या गप्पा असायच्या.
जेव्हा नानांनी घेतलेली दादांची फिरकी
मल्हार पाटेकरची ती भावूक पोस्ट...