बारामती व्यापारी महासंघ यांच्यातर्फे व्यवसाय कर रद्द करण्यासाठी प्रांताधिकारी यांना निवेदन
मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६
Edit
बारामती: आज बारामती व्यापारी महासंघ यांच्यातर्फे मा.वैभव नावडकर, प्रांत साहेब ,बारामती यांना व्यवसाय कर रद्द करणे बाबत निवेदन देवेंद्र फडवणीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या नावाने देण्यात आले.
व्यवसाय कर हा सर्वसामान्य नोकरदार वर्ग, व्यापारी उद्योजक यांच्यावर अतिरिक्त व अन्यायकारक आर्थिक भार टाकणारा ठरत आहे.
सरकारने या विषयाचे गांभीर्याने दखल घेऊन व्यवसाय कर रद्द करणे बाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती बारामती व्यापारी महासंघातर्फे करण्यात आली.
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशील कुमार सोमानी, जगदीश पंजाबी, स्वप्निल मुथा, प्रशांत चांदगुडे, महेश ओसवाल, मनोज मुथा, प्रवीण आहूजा, सलीम तांबोळी इत्यादी उपस्थित होते.