बारामती येथील पोलीस कॉन्स्टेबलची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

बारामती येथील पोलीस कॉन्स्टेबलची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

 

बारामती: बारामती शहरात एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली असून पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका कॉन्स्टेबलने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिगवण रोडवरील सम्यक कापड दुकानाच्या शेजारी असलेल्या उड्डाणपुलाजवळील रेल्वे ट्रॅकवर घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रेल्वे ट्रॅकवरून जाणाऱ्या मालगाडीखाली उडी घेऊन संबंधित पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याचे समजते. या घटनेत रमेश बापू बनसोडे यांचा मृत्यू झाला आहे. ते पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते.

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.