प्रफुल पटेल आग्रही, १५ आमदारांचीही साथ, पण सुनेत्रा पवार भारी पडल्या, राष्ट्रवादी च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कशी झाली निवड?
सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे हातात घ्यावीत, असे पक्षातील अजित पवार यांच्या समर्थक आमदारांचे म्हणणे होते. तर प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड व्हावी, यासाठी काही आमदारांना तयार केले गेले होते, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले. परंतु पवारांच्या पक्षाचा पवारच अध्यक्ष व्हावा, अशी सूचना दिल्लीतून आल्याने अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून पटेल यांचे नाव आपोपाप मागे पडले. अजित पवार यांच्या जाण्यानंतर पवार कुटुंबामागे सहानुभूती आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी पक्षाची सूत्रे हातात घ्यावीत, त्याचा पक्षाला फायदा होईल तसेच पक्षातील लोकप्रतिनिधी एकसंध राहतील, असे लोकप्रतिनिधींचे म्हणणे होते. पक्षातील सर्वांच्या विनंतीला मान देऊन सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे स्वीकारली.
प्रफुल पटेल यांनीच सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, सुनील तटकरे यांचे अनुमोदन
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रस्ताव मांडला. त्यांच्या प्रस्तावाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अनुमोदन दिले.