बारामतीत 'भुली यादे' पथनाट्याद्वारे जनजागृती

बारामतीत 'भुली यादे' पथनाट्याद्वारे जनजागृती

 

बारामती:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन बारामतीत तिरंगा सर्कल येथील नटराज नाट्यकला मंदिर येथे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या कलाकारांनी जागतिक महिला दिनानिमित्त रविवार दि.८ रोजी 'भूली यादें' हे पथनाट्य सादर केले.

कार्यक्रमाचे सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजितदादां पवार यांना उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. हा कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्यात आला. बारामती भगिनी मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.स्मृतिभ्रंशय(अल्झायमर  आजाराबाबत या पथनाट्या द्वारे समाजप्रबोधन करण्यात आले.शहरातील राष्ट्र सेविका संघ,जिजाऊ सेवा संघ,अखि ल भारतीय मराठा महासंघ, माहेरचं अंगण ग्रुप,दिगंबर जैन श्राविका मंडळ,जायंटस् ग्रुप ऑफ सहेली,जायंटस् ग्रुप ऑफ हिरकनी,जायंटस् ग्रुप ऑफ़ गोल्ड,कल्याणी महिला पतसंस्था,मनस्वी कंप्युटर अँड टाइपिंग इंस्टी ट्यूट,लिनेस क्लब ऑफ बारामती,सावित्रीबाई फुले महिला मंडळ,आनंदीबाई ब्राह्मण महिला संघटना, अक्कमहादेवी भजनपरिवार, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला आघाड़ी, इस्कॉन बारामती,वैष्णवी समिती,महिला राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका प्रमुख बारामती,आभाळ माया ग्रुप ही विविध मंडळे तसेचविविध महिला संघटनांच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.पथनाट्याची संकल्पना डॉ.मंगला जोगळे कर यांची होती.सुचेता बापट, नीता केळकर,यशश्री हुद्दार आणि अनघा लघाटे यांनी प्रभावी अभिनयातून स्मृतिभ्रंशा सारख्या जटिल आजाराचे वास्तव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विविध समस्या मांडल्या. 

      अल्झायमरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेडसावणाऱ्या अडचणी कशा कमी करता येतील, तसेच हा आजार पूर्णपणे नष्ट होत नसला तरी रुग्णांचा त्रास कसा कमी करता येऊ शकतो याबाबत 'भूली यादें' टीमने उपस्थितांना मार्गदर्शन 

केले.

     बारामतीच्या मानसोपचार तज्ञ डॉ.अपर्णा घालमे यांनी शंकांचे निरसन केले. उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, नगरसेविका तसेच शहरातील पाचशे महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या.कार्यक्रमात सहभागी झालेल्या १७ संघटनांची माहिती भगिनी मंडळाच्या मुख्य विश्वस्त सुनीता शहा यांनी दिली. सूत्रसंचालन कविता यादव यांनी केले तर सुवर्णा जोशी यांनी सर्वांचे आभार मानले.