१० राज्यांतील २४ राज्यसभा जागांसाठी निवडणुकीची घोषणा

१० राज्यांतील २४ राज्यसभा जागांसाठी निवडणुकीची घोषणा

 


नवी दिल्ली: देशातील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १० राज्यांमधील २४ राज्यसभा जागांसाठीच्या निवडणूक तारखांची घोषणा केली आहे. या सर्व जागांवर १८ जून २०२६ रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर संबंधित १० राज्यांमध्ये राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे.

राज्यसभेतून २१ जून ते १९ जुलाई २०२६ या कालावधीत वेगवेगळ्या तारखांना विद्यमान खासदारांचा कार्यकाळ संपत असल्याने या जागांसाठी निवडणूक घेतली जात आहे.

मल्लिकार्जुन खरगे, देवगौडा यांच्यासह 'हे' बडे नेते...
या निवडणुकीत देशातील अनेक दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे वरिष्ठ सभागृहातून निवृत्त होणार आहेत. राजस्थानमधून राजेंद्र गेहलोत, नीरज डांगी आणि रवनीत सिंह बिट्टू यांच्या जागा रिकाम्या होत आहेत. या नेत्यांच्या जागी आता भाजप आणि काँग्रेस कोणाला संधी देणार, तसेच संख्याबळानुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

कोणत्या राज्यात किती जागांसाठी निवडणूक?
या निवडणुकीत प्रामुख्याने आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या तीन राज्यांवर सर्वांचे लक्ष असणार आहे. राज्यनिहाय जागांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

राज्यखाली होणाऱ्या जागा
आंध्र प्रदेश४ जागा
गुजरात४ जागा
कर्नाटक४ जागा
मध्य प्रदेश३ जागा
राजस्थान३ जागा
झारखंड२ जागा
मणीपूर१ जागा
मेघालय१ जागा
अरुणाचल प्रदेश१ जागा
मिझोरम१ जागा