पेपर देऊन घरी जाताना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले; इंदापूरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
शुक्रवार, २९ मे, २०२६
Edit
इंदापूर: भाटनिमगाव ( ता. इंदापूर) येथील मागासवर्गीय समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन एकावर पोक्सो व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमीर महमद सय्यद
(रा.भाटनिमगाव) असे आरोपीचे नाव आहे. पोलीसांकडून मिळालेल्या
माहितीनुसार,१६ वर्षांची पिडिता अकरावीची विद्यार्थिनी आहे. चालू महिन्यात
ती परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन परतत असताना, आरोपीने तिला आपल्या कारमधून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये
बसवले. निर्जन ठिकाणी कार थांबवून नेऊन जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर
अत्याचार केले. तिच्या जातीचा जातीचा उल्लेख करून तिला अपमानित केले व हा
प्रकार कोणाला काही सांगितल्यास कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी आरोपीने
दिली, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. हे प्रकरण येथेच संपले
नाही. २८ मे २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपीने पुन्हा
पीडितेच्या घरी जाऊन तिचा हात धरला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
त्यामुळे पीडितेच्या आईने पोलिसांत धाव घेतली. बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड पुढील करत आहेत.