ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्
मिळालेल्या माहितीनुसार, नीट पेपरफुटी प्रकरणी शिवराज माटेगावकर हा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. त्यानेच पी.व्ही. कुलकर्णी याची आणि मनीषा मांढरे हिची एनटीएच्या पॅनेलमध्ये समावेश केल्याची माहिती समोर आली. मांढरे बायॉलॉजी आणि कुलकर्णी याची केमिस्ट्रीचा पेपर सेट करण्यासाठी वर्णी लावली, या दोघांनीही माटेगावकर याला पेपर पोहोच करायचा होता. माटेगावकर हा पेपर लिक करणाऱ्या टोळीचा सदस्य असल्याचा खुलासा झाला आहे.
मनीषा मांढरेने मोबाईल किंवा कागदाचा वापर केला नाही
मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा मांढरे हिने नीटचा पेपर फोडताना कागद किंवा मोबाईलचा वापर केलेला नाही. मनीषा मांढरेची स्वत:ची स्मरणशक्ती चांगली होती. त्यामुळे याच स्मरणशक्तीचा तिने उपयोग केला. मांढरेला सर्व प्रश्न तोंडपाठ होते. तिने कोणताही पुरावा मागे सोडलेला नाही, तिच्या या ट्रिकने सीबीआयही चक्रावले आहे. तिच्याविरोधात अजूनही कोणताही पुरावा सापडलेला नाही.नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा वाघमारे हिने मांढरे हिचे नाव घेतल्यामुळे तिला ताब्यात घेतले आहे, पण तपास यंत्रणेला कोणताही पुरावा मिळालेला नसल्याची माहिती समोर आली.
मनीषा मांढरे ही गेल्या २५ वर्षापासून बायॉलॉजी हा विषय शिकवत आहे. यामुळे तिला कोणताही प्रश्न लिहून घ्यावा लागला नाही, तिने पेपर सेट केल्यानंतर हे प्रश्न डोक्यात ठेवून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. तिच्याविरोधात आता सीबीआय पुरावा शोधण्याचे काम करत आहे.