बारामती नगरपरिषद शिक्षण विभागाच्या गुणवत्तावाढ कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
बारामती: बारामती नगरपरिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष मार्गदर्शन व गुणवत्तावाढ आढावा कार्यक्रमास शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात शिक्षण विभागाची भावी दिशा, शाळांमधील गुणवत्तावाढ, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम तसेच शिक्षणातील सकारात्मक बदल यावर सखोल चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव हे उपस्थित होते. यावेळी उपनगराध्यक्षा तथा शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती श्वेताताई नाळे, मुख्याधिकारी पंकज भुसे, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय चे माजी प्राचार्य चंद्रशेखर मुरूमकर, उपगटनेते संपदा चौधर, विशाल हिंगणे, गोरख पारसे, सोमनाथ गजाकस, गणेश जोजारे, शर्मिला ढवाण, मंगला किर्वे, अश्विनी सातव, सविता जाधव,विजया खरात, रूपाली मलगुंडे, मनीषा बनकर, संघमित्रा चौधरी,प्रवीण माने,अमोल कावळे, राजेंद्र सोनवणे, निलेश इंगुले, सुनील सस्ते, विष्णुपंत चौधर, अल्ताफ सय्यद, अविनाश निकाळजे, अभिजीत जाधव तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका, शिक्षण समिती सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक व आकांक्षा फाउंडेशन चे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्वेताताई नाळे यांनी प्रस्तावना मांडताना शिक्षण समितीमार्फत मागील काही महिन्यांत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आधुनिक व प्रभावी उपक्रम राबवून नगरपरिषदेच्या शाळांमध्ये दर्जात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यानंतर शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी अक्षय मांडवे यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये नगरपरिषद शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या विशेष उपक्रमांची माहिती सादर केली. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा आढावा त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.