पश्चिम बंगालमध्ये दोन नवीन 'होल्डिंग सेंटर' सुरू, घुसखोरांचे धाबे दणाणले! सरकारची मोठी कारवाई

पश्चिम बंगालमध्ये दोन नवीन 'होल्डिंग सेंटर' सुरू, घुसखोरांचे धाबे दणाणले! सरकारची मोठी कारवाई

 


पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्षाने, भाजप सरकार आल्यास, घुसखोरांना बाहेर काढण्याचे आश्वास नदिले होते. त्यनुसार आता घुसखोरांवर कारवाईही सुरू करण्यात आली आहे. सुवेंदू अधिकारी सरकारने याअंतर्गत सोमवारी राज्यात दोन नवीन 'होल्डिंग सेंटर' (डिटेंशन कॅम्प) सुरू केले आहेत. येथे २४ तासांहूनही कमी वेळात १२ बांगलादेशी घुसखोरांना डांबण्यात आले आहे. हा सरकारचा 'डिटेक्ट, डिलीट आणि डिपोर्ट' मोहिमेचा भाग आहे.

सरकारचे निर्देश मिळताच केवळ २४ तासांत कारवाई -
यांपैकी, ९ जणांना मालदा येथील पहिल्या होल्डिंग सेंटरमध्ये तर ३ जणांना मुर्शिदाबाद जिल्ह्यातील लालगोला येथील डिटेंशन सेंटरमध्ये डांबण्यात आले आहे. या घुसखोरांना परत बांगलादेशात पाठवण्यात येणार आहे. यापूर्वी त्यांना मुर्शिदाबादचे लालगोला आणि मालदाचे इंग्लिश बाजार येथे उभारण्यात आलेल्या या सेटर्समध्ये ठेवण्यात येणारर आहे. महत्वाचे म्हणजे, सरकारचे निर्देश मिळताच केवळ २४ तासांतच ही कारवाई करण्यात आली आहे.

चंदन पार्क, इंग्लिश बाजार येथील होल्डिंग सेंटरमध्ये सीसीटीव्ही, पोलीस आणि सिव्हिल डिफेन्स तैनात करण्यात आले आहे. सध्या येथे ३ महिला आणि ६ अल्पवयीन बालकांसह ९ जणांना ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे, मुर्शिदाबादच्या राणीतला येथून मोहम्मद सलीम, मोहम्मद रुबेल आणि शरीफुल इस्लाम या तीन संशयीत घुसखोरांनाही वैध कागदपत्रे न मिळाल्याने ताब्यात घेण्यात आले आहे.

इंग्लिश बाजारचे आमदार अमलान भादुडी यांनी म्हटले आहे की, कायदेशीर प्रक्रियेनंतर या चिन्हांकित लोकांना मायदेशी पाठवण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे (BSF) सुपूर्द केले जाईल. मालदामध्ये ही पडताळणी मोहीम सुरूच राहील. तसेच, बांगलादेशी आणि रोहिंग्यांसह अवैध स्थलांतरितांना आता सामान्य कैद्यांसोबत नियमित जेलमध्ये न ठेवता थेट होल्डिंग सेंटर्समध्ये पाठवावे, असे आदेश गृह विभागाने दिले आहेत. सध्या बीएसएफ आणि जिल्हा पोलीस संयुक्तपणे त्यांची माहिती गोळा करत आहेत.