देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर

देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर

 



नवी दिल्ली: देशभर आज १५ मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोलचा दर ३.१४ रुपयांनी वधारला आहे, तर डिझेल ३.११ रुपये प्रति लिटर महाग झालं आहे. प्रीमियम पेट्रोलच्या किमतीतही राज्यानुसार वाढ झाली असून, आता हे पेट्रोल १०५.१४ ते १०७.१४ रुपये प्रति लिटर या दरम्यान मिळत आहे.

दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर ₹९७.७७ प्रति लिटर आहे, तर मुंबईमध्ये तो ₹१०६.६४ आणि कोलकातामध्ये ₹१०८.७४ प्रति लिटर नोंदवला गेला आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर ₹१०३.९० प्रति लिटर, तर बंगळुरूमध्ये तो ₹१०६.१७ प्रति लिटर आहे. याव्यतिरिक्त, जयपूरमध्ये पेट्रोलचा दर ₹१०८.१९ प्रति लिटर आणि पाटणामध्ये तो ₹१०८.५५ प्रति लिटर आहे.

सर्वात स्वस्त आणि महाग पेट्रोल कुठे?

शहर         पेट्रोलची किंमत       बदल
नवी दिल्ली         ₹97.77      +3.00
मुंबई         ₹106.64      +3.10
कोलकाता         108.74      +3.29
गुरुग्राम         ₹98.29      +2.99
नोएडा         ₹90.04      +3.30
हैदराबाद        ₹110.89      +3.39
लखनौ        ₹97.58      +2.85

मोठ्या शहरांचा विचार केला तर नोएडामध्ये पेट्रोल सर्वात स्वस्त असून तेथे ९०.०४ रुपये प्रति लिटर असा दर आहे. लखनौमध्येही हा दर ९७.५८ रुपये आहे. दुसरीकडे, हैदराबाद (११०.८९ रुपये) आणि तिरुवनंतपुरम (११०.७५ रुपये) येथे पेट्रोलचे दर देशात सर्वाधिक आहेत.

सर्वात स्वत आणि महाग डिझेलची कुठे?

 

शहर     डिझेलची किंमत         बदल
नवी दिल्ली     ₹90.67         +3.00
मुंबई     ₹93.14         +3.11
चेन्नई     ₹95.47         +3.08
गुरुग्राम     ₹90.77        +3.00
बंगळुरु     ₹94.10        +3.11
हैदराबाद     ₹98.96        +3.26
लखनौ    ₹90.87        +3.01

डिझेलच्या दरांबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्लीमध्ये डिझेलचा दर ₹९०.६७ प्रति लिटरवर पोहोचला आहे; तर मुंबईमध्ये तो ₹९३.१४ आणि कोलकातामध्ये ₹९५.१३ प्रति लिटर इतका आहे. चेन्नईमध्ये डिझेलचा दर ₹९५.४७ प्रति लिटर, तर बंगळुरूमध्ये ₹९४.१० प्रति लिटर नोंदवला गेला आहे.