राहुल गांधी यांनी केलेला दावा म्हणजे मुंगेरीलाल के हसिन सपने आहेत; राहुल गांधींना फडणवीसांचा टोला
सोमवार, २५ मे, २०२६
Edit
मुंबई: केंद्रातील सरकार हे वर्षभरात कोसळेल, असं भाकित काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यावरून आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांनी टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी केलेला दावा म्हणजे मुंगेरीलाल के हसिन सपने आहेत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
दरम्यान, पुढील एक वर्षाच्या आत केंद्रातील मोदी सरकार कोसळणार आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक परिस्थिती आणि देशात वाढत असलेला आर्थिक असंतोष ही या मागची मोठी कारणं असतील, असं भाकित राहुल गांधी यांनी केलं होतं.सध्या देशात ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण होत आहे. तसेच लोकांमध्ये ज्या प्रकारे नाराजी वाढत आहे, त्याचा परिणाम भारतीय राजकारणावर दिसून येईल, असे राहुल गांधी म्हणाले होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक परिस्थिती आणि देशात वाढत असलेला आर्थिक असंतोष ही या मागची मोठी कारणं असतील, असं भाकित राहुल गांधी यांनी केलं होतं.