नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम' केंद्र सरकारच्या रडारवर; उच्च न्यायालयात दाखल केले प्रतिज्ञापत्र
प्रतिज्ञापत्रानुसार, एनटीएने असे अनेक टेलिग्राम चॅनेल्स, ग्रुप्स आणि बॉट्स ओळखले आहेत, हे फुटलेली प्रश्नपत्रिका पसरवण्यात आणि नीट परीक्षेसंबंधित फसवणुकीच्या कारवायांमध्ये होते.
केंद्र सरकारने सादर केले प्रतिज्ञापत्र
अधिकाऱ्यांनी सुरुवातीला सर्वात कमी निर्बंधांचा दृष्टिकोन स्वीकारला आणि टेलिग्रामवर तात्काळ बंदी घातली नाही. ॲपवर बंदी घालण्याऐवजी, अधिकाऱ्यांनी ३ जून २०२६ रोजी टेलिग्रामच्या प्रतिनिधींना बैठकीसाठी बोलावले, असे यामध्ये म्हटले आहे.
या बैठकीदरम्यान, परीक्षेच्या फुटलेल्या प्रश्नपत्रिका पसरवणारे चॅनेल्स सक्रियपणे ओळखण्यात आणि थांबवण्यात टेलिग्राम अपयशी ठरले आहे, असे केंद्राने म्हटले. अशा प्रकारचे मटेरीअल सक्रियपणे शोधण्यातील आपल्या मर्यादा टेलिग्रामने मान्य केल्या आहेत आणि तक्रार केलेल्या चॅनेल्सवर नियंत्रक काम करत असल्याचे सांगितले.
२१ जूनला होणार परीक्षा
नीट यूजी २०२६ परीक्षा ३ मे रोजी झाली होती, पण परीक्षा पार पडण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याचे उघड झाले. यामुळे आता २१ जून रोजी पुन्हा एकदा परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरवल्या जातील आणि परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व व्यवस्था केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.