सोलापूरमध्ये मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांसह संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार योगेश पाटील हे नंदूरबारमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, योगेश पाटील यांना शेअर मार्केटमध्ये सातत्याने नुकसान होत होतं. त्यातून त्यांच्या डोक्यावर तब्बल १ कोटी ८० लाख रुपयांचं कर्ज झालं होतं. या कर्जाच्या चिंतेमुळेच योगेश पाटील यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.
मुख्याध्यापक असलेल्या योगेश पाटील यांनी बचतीसाठी शेअर बाजारात गुंतवणूक केली होती. मात्र यात त्यांना सातत्याने तोटा होत होता. तसेच या तोट्यामधूनच त्यांच्या डोक्यावर सुमारे १ कोटी ८० लाखांच्या आसपासचं कर्ज झालं होतं. त्यामुळे ते चिंतीत होते. त्यातूनच योगेश यांनी पत्नी माधुरी, मुलगा अथर्व आणि शिवांश यांच्यासोबत मिळून जीवन संपवलं. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. तर या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.