एका झटक्यात पारडे फिरले...! शिंदेसेनेचे खासदार कितीने वाढणार? काँग्रेसपेक्षा कमी, भाजपपेक्षा जास्त...
२०२४ चा मूळ जनादेश काय होता...
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ४८ पैकी ३१ जागांवर (काँग्रेसच्या बंडखोर अपक्षासह) दणदणीत विजय मिळवला होता. तर सत्ताधारी महायुतीला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले होते.
काँग्रेस: १३ खासदार+१ अपक्ष = १४
भाजप: ९ खासदार
शिवसेना : ९ खासदार
NCP (शरद पवार गट): ८ खासदार
शिवसेना (एकनाथ शिंदे गट): ७ खासदार
अजित पवार राष्ट्रवादी : १ खासदार
खासदार फुटीनंतरचे चित्र
६ खासदारांच्या पक्षांतरामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार पडले असून त्यांच्या जागा ९ वरून थेट ३ वर आल्या आहेत. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संख्याबळ ७ वरून थेट १३ खासदारांवर पोहोचले आहे. एवढे झाले तरी सध्या मविआचे २५ आणि महायुतीचे २३ खासदार होत आहेत.
या बदललेल्या गणितानुसार महाराष्ट्रातील टॉप पक्षांची स्थिती आता खालीलप्रमाणे आहे:
३. भाजप (९ खासदार): सर्वाधिक २८ जागा लढवूनही भाजप आता तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. शिंदेसेनेचे खासदार आता भाजपपेक्षा जास्त झाले आहेत.
४. NCP - शरद पवार गट (८ खासदार): चौथ्या क्रमांकावर स्थिर.
५. शिवसेना - ठाकरे गट (३ खासदार): लोकसभेत महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे गट खालून दुसऱ्या क्रमांकावर आहे.