जुलै महिन्यात तरी पुरेसा पाऊस पडणार का? हवामान विभागाचा मासिक अंदाज आला
बुधवार, १ जुलै, २०२६
Edit
नवी दिल्ली: भारतीय हवामान शास्त्र विभागाने मंगळवारी देशातील पावसाचा मासिक अंदाज
जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, मुख्य मान्सूनचा महिना असलेल्या जुलैमध्ये
देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस
पडण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या या अंदाजामुळे देशातील शेती कामे आणि जल
व्यवस्थापनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जुलैमध्ये अवघा ९४% पाऊस पडणार
हवामान
विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार,
जुलै महिन्यात देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत सुमारे ९४ टक्केच पाऊस
होण्याचा अंदाज आहे. एखाद्या भागात ३० ते ५० वर्षांच्या प्रदीर्घ काळात
झालेल्या पावसाची सरासरी काढून LPA निश्चित केला जातो. सध्याच्या
अंदाजासाठी १९७१ ते २०२० या ५० वर्षांचा कालावधी आधार मानण्यात आला आहे.
भारतामध्ये जुलै महिन्यासाठीचा दीर्घकालीन सरासरी पाऊस २८०.४ मिमी इतका
आहे, ज्यामध्ये यंदा घट पाहायला मिळू शकते.
'या' भागात होणार सामान्यपेक्षा जास्त पाऊस
देशातील
बहुतांश भागांत पाऊस कमी राहणार असला, तरी काही विशिष्ट क्षेत्रांना मात्र
दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार खालील भागात सामान्य ते
सामान्यपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारत,
ईशान्य भारत, पूर्व-मध्य भारत, पूर्व द्वीपकल्पीय भारताचे काही भागाचा
समावेश आहे.
शेतकरी आणि प्रशासनाला नियोजनाचा सल्ला
जुलै
महिन्यातील पावसाची तूट देशातील जलसाठे आणि खरिपाच्या शेतीवर थेट परिणाम
करू शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आणि जल व्यवस्थापन करणाऱ्या सरकारी
यंत्रणांनी हवामान विभागाच्या या सुधारित अंदाजाचा अभ्यास करूनच आपल्या
पुढील कामांचे व पाण्याचे नियोजन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.