​माहेरचं आंगण ग्रुपचा पारंपारिक खेळांचा जागर

​माहेरचं आंगण ग्रुपचा पारंपारिक खेळांचा जागर

 

बारामती: ​वडगाव निंबाळकर येथे नागपंचमी निमित्त लोप पावत चाललेल्या पारंपरिक खेळांना उजाळा देण्यासाठी वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीच्या वतीने, माहेरचं आंगण ग्रुप बारामतीच्या महिलांचे महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य विद्या मंदिर शाळेच्या प्रांगणात झालेल्या या उपक्रमाला महिला व विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

      ​यावेळी 'माहेरचं आंगण ग्रुप,बारामती'च्या सदस्यांनी फुगडी,झिम्मा यांसारख्या पारंपारिक खेळांची प्रात्य क्षिके सादर केली. माहेरचं आंगणच्या अध्यक्षा शुभांगी महाडीक व सदस्य ज्योती गाडे,पल्लवी म्हेत्रे,वसुधा वाघ व सहकारी वैशाली जाधव यांनी यामधे पुढाकार  घेतला. माहेरचं आंगणच्या अध्यक्षा शुभांगी महाडीक यानी या खेळांचे सांस्कृतिक महत्त्व विशद केले. नव्या पिढीला या संस्कृतीची ओळख करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

     ​कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या रोहिणी कदम ढोले, पंचायत समिती सदस्य जितेंद्र पवार, प्रशा सक सुनील ढोले, संगीता शहा, पद्मावती शिंदे, सारिका खोमणे, वैशाली जाधव, स्मिता गायकवाड, समीना ढोले, ताराबाई पवार, हेमा खोडके, मनीषा रासकर आदी उपस्थित होत्या. मुख्याध्यापक हेमंत तांबे यांनी प्रास्ताविक केले. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे आणि माहेरचं आंगणच्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.